वेड्यापिश्या झुंझारतेने रोखली मी वादळे
पेल्यात माझ्या दाटलेली झोकली मी वादळे
आम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे
नाही कधी जुळले फुलांशी, माळली मी वादळे
काहीतरी देऊन जावे मागणी झाली जिथे
माझ्याकडे खेळायची ती सोडली मी वादळे
व्हावी तशी आरास काही होईना मांडू कशी
हातातली आताच सगळी ओतली मी वादळे
झोपायला जमतेच ना स्वप्ने कशी पाहू तुझी
कंटाळुनी आता उशाला आणली मी वादळे
तुषार जोशी, नागपूर
२० एप्रिल २०११, ०८:३०
गझल आवडली
उत्तर द्याहटवा"आम्ही फुलांचे स्वप्न नाही पाहिले ऐसे नव्हे..."
पाटणकरांची आठवण आली एकदम !