घनाक्षरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घनाक्षरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

जगावे कसे

(छंद: घनाक्षरी)

नको होईल जगणे, वीट येईल स्वतःचा
तरी पुढे जात रहा, माघार घेऊ नको

अन्याय जिंकेल जेव्हा, न्याय दिसणार नाही
लढत रहा जिद्दीने, लाचार होऊ नको

प्रश्न छळतील जेव्हा, उत्तरे ना मिळतील
प्रकाशाचा दूत हो तू, अंधार होऊ नको

जगणे मिळाले तसे, जगावे कसे कळेल
कसे होईल ही भीती, मनात ठेऊ नको

~ तुष्की
नागपूर, २६ आगस्ट २०१३, ००:००