लोकल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लोकल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जुलै, २०१२

रीत

संध्याकाळी ताजे
गुलाब घ्यावे म्हणतो.
तिच्या कुरळ बटांना
हळुच सजवावे म्हणतो
.
छोट्यासाठी लुडो
घेऊनच आलो आज
देईन आणि बघेन
त्याचा हर्षित नाच
.
धडाम वाजले काय
जाणवत नाही पाय.
आई, बाबा, माझी मनू
जन्म आठवला जणू
.
लोकल झाली माती
कितेक स्वप्ने मिटली.
हे जीवन संपवण्याची
तुझी रीत रे कुठली?
.
तुषार जोशी, नागपूर
२८ नोव्हेंबर २००७
+९१ ९८२२२ २०३६५