गळती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गळती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

चिखल

राजकारणाचा
चिखल हा झाला
भ्रष्टाचार सारा
अन्याय माजला

जपावे कसे हो
मनाचे कमळ
टिकावे कसे हो
विचार निर्मळ

संताप संताप
जिवाचा वाढतो
उपाय सुचेना
वैताग जाळतो

राज्य कारभार
प्रणाली नासली
जनमानसात
लाचारी साचली

त्रासुन तरूण
विदेशी पळती
थांबवावी कशी
ज्ञानाची गळती

समाजाने आता
पेटून उठावे
अंधकारमय
ग्रहण फिटावे

विचार क्रांतीचा
पाऊस पडावा
चिखल सगळा
धुवून निघावा

~ तुष्की
नागपूर
१६ आक्टिबर २०१२, १२:४०