आश्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आश्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ मे, २०१२

पिल्लू

भेटीस माऊलीच्या
आसावले कधीचे
पिल्लू कुण्या अभाग्या
घायाळ पक्षिणीचे
.
डोळ्यात रोज पाणी
आणूनिया पहाते
जेव्हा कुणाचि आई
पिल्लू कुशीत घेते
.
असल्या किती पिलांना
आईचि भेट नाही
म्हटली कधीच नाही
साधी कुणी अंगाई
.
होतो जराशि आई
डोळे करूण स्मरतो
भेटीस त्या पिलांच्या
मी आश्रमात जातो
.
.
तुषार जोशी, नागपूर
(१५ मार्च २००९, टेरीटाऊन)