बद्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बद्दी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ मे, २०१३

बद्दी

तू अशी काही चोट लावायचास
की माझे सगळे कंचे
सैरावैरा व्हायचे
तुला बद्दीत कंचे टाकताना
फक्त पाहणे सुद्धा
भान विसरू लावायचे

आज सिग्नल वर
माझ्या एसी कारच्या खिडकीतून पाहिले...
तुला सायकल वरून जाताना...
आता ती खेळातली बद्दी
इतकी मोठ्ठी झाली आहे … … जणू दरीच भासतेय
तुझ्या माझ्या मधली.

~ तुष्की
नागपूर, १२ मे २०१३, १०:१५