जॉली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जॉली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ मे, २०१३

जॉली

किस ची जॉली लावल्या पासून
तू कधीच हरली नव्हतीस
वेगवेगळ्या वेळांवर गाठले तरी
हातावर जॉली, हसत दाखवायचीस

तुझा अठरावा वाढदिवस
मी गिफ्ट देऊन म्हणालो जॉली
तू रिकामा हात दाखवलास
डोळ्यात लज्जा, गालावर लाली

~ तुष्की
नागपूर, १२ मे २०१२, १२:००