ओठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ओठ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

ऋण

त्या दिवशी
त्या धुंद मिठीत
तू ओठांचे अर्धेच भास ठेवून गेलेलीस
ते भास घेऊन
मी काळवाटेवर
अजूनही त्याच ग्लानीत जगतो आहे
कोण्या एका वळणावर पुन्हा
आपली भेट होईलच
तुझ्या ओठांचे
ऋण फेडण्यासाठी
हा ध्यास नाही
हा विश्वास आहे
कारण..
दोघांनाही सारखेच वाटणे
इच्छेला विश्वासात बदलत असते

~ तुष्की
नागपूर, १२ जुलाई २०१३, ११:००