निश्चय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निश्चय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ जून, २०१२

ठिणगी

कौशल्याची ठिणगी तुझ्यात आहेच
फक्त प्रयत्नांचा वारा हवाय
कधी कधी मन खचतं डळमळतं
बळकट शब्दांचा मारा हवाय

ज्वाळा व्हायला आतुर असेल ठिणगी
सातत्याचा तिला आधार हवाय
पेटून आयुष्य लख्ख होईलच
निश्चय हवाय निर्धार हवाय

तुषार जोशी, नागपूर
 २७ जून २०१२, ०७:००
+९१ ९८२२२ २०३६५