पुढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २९ जून, २०१२

सतत पुढे जा

सतत पुढे जा
तुझी वाट पाहत आहेत
शहरे प्रकाशाची
तुझ्या प्रगतीला सीमा आहे
फक्त आकाशाची

सतत पुढे जा
तुला नेहमी साथ आहेच
तुझ्या लोकांची
देवापुढे म्हटलेल्या
मंगल श्लोकांची

सतत पुढे जा
यशाच्या किर्तीच्या ही
पुढे पाऊल टाक
प्रेमाच्या सुगंधाने
जग व्यापून टाक

तुषार जोशी, नागपूर!
२९ जून २०१२, २२:००
+९१ ९८२२२ २०३६५