गुन्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुन्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ जुलै, २०१२

गुन्हा

गोड मुलीशी ओळख केली
झाला एवढाच गुन्हा
सुचला कसा कुणास ठाऊक
असला शहाणपणा
.
एकटेपणा, कंटाळा हे
मित्र झाले परके
वाईट्ट मेले चांगले विचार
जवळ येतात सारखे
.
थोडं काही चुकलं तर
शिक्षा आहे ठरलेली
गोड बोलणी खावी लागतात
साखरेत बुडवलेली
.
पोरकेपणाची चांगली भावना
गेली मला सोडून
दुष्ट प्रेम ममता यांच्यात
गेलो पार बुडून
.
भुतासारखा मानगुटीवर
बसलाय बघा गुन्हा
इतकं झालं तरी करावा
वाटतो पुन्हा पुन्हा
.
तुषार जोशी, नागपूर
१७ फेब्रूवारी १९९७
+९१ ९८२२२ २०३६५