मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण
एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण
मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण
तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवानवी उमंग, नवी दिशा
उत्तर द्याहटवाकविता वाचून बदलेल जीवनाचा नकाशा…