सखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ६ जून, २०१२

तो बोलतो न काही

भारीच त्रास देतो तो बोलतो न काही
मौनास वीट येतो, तो बोलतो न काही

शब्दात प्रीत माझी सांडून वाहताना
डोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही

मी मागते कितीदा ते शब्द काळजीचे
बागेत रोज नेतो, तो बोलतो न काही

स्वप्ने किती बघू मी बोलेल आज राजा
स्पर्शात जीव घेतो, तो बोलतो न काही

ते काल बोलताना तू पाहिलेस ज्याला
माझा सखा नव्हेतो, तो बोलतो न काही

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२१ आक्टोबर २०१०, ००:००