पायघड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पायघड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ जून, २०१२

खपली - १

तू फुंकर घातलीस आणि
चटकन खपली धरली
तुझ्या सोबत असण्याने
जखम नकळत भरली

तुझ्या काळजीने मिळाल्या
फुलांच्या पायघड्या
निर्धास्त पणे घेता आल्या
स्वप्नांच्या मोठ्या उड्या

तूच माझे औषध होतास
वेदना जायच्या सरून
तूच दिलेली जखम आता
कशी रे काढू भरून?

तुषार जोशी, नागपूर
१५ जून २०१२, ००:००
+९१ ९८२२२ २०३६५