मन्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मन्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ जून, २०१२

MAG 1848

MAG 1848 मागची सीट
पोटाला घट्ट धरलेला हात नीट
नेहमीचा वास बाबाच्या शर्टाचा
नीट बस रे मन्या झोपलास का?
.
बाबा गेला गाडी माझी झाली
मागची सीट कायमची सुटली
मागच्या सीटशी थबकतो आजही
आठवते ’मन्या’, शर्टाचा वासही
.
MAG 1848 बाबाची साथ
हा स्कूटर नव्हे मायेचा हात
एक घरचा सदस्य खूप जुना
जपतो माझ्या बाबाच्या खुणा
.
तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५