तुला पाहता जीव वेडावतो गं तुला पाहता
सुखाचा झरा का उरी वाहतो गं तुला पाहता?
तुझे केस सोडून ते मोकळे तू मला भेटता
उन्हाळ्यातही गारवा भासतो गं तुला पाहता
तुझा सावळा रंग आहे तुझा देखणा दागिना
मधाचा मधू गोडवा लाजतो गं तुला पाहता
तुझे हासणे ओतते धूंद तारूण्य चोहीकडे
पहा मंद वारा कसा नाचतो गं तुला पाहता
तुझे ओठ सांगून जाती मुक्याने हवे ते मला
जिवाचा शहारा पुरा पेटतो गं तुला पाहता
तुझे रूप वेधून घेते मनाला खुळ्या सारखे
तुझी साथ लाभो सदा मागतो गं तुला पाहता
तुषार जोशी, नागपूर
११ मार्च २०११, २२:५०
वाह तुषार
उत्तर द्याहटवाप्रत्येक शेर अप्रतिम
मला माझी गझल आठवली
सकाळी सकाळी....
दवाने चमकते सकाळी सकाळी!
कळी ही उमलते सकाळी सकाळी!!
अहोरात्र जैशी फुले रातराणी;
तशी तू बहरते सकाळी सकाळी!
तुझ्या अंगणाची झुळुक रोज येते....
मला अन् बिलगते सकाळी सकाळी!
अशी सोडते ती बटा...वाटते की,
नभाला उसवते सकाळी सकाळी!
जसा गंध साबिर फुलातून जातो....
तशी ती निसटते सकाळी सकाळी!
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)