किती तरी दिवसात आपली
भेटच झाली नाही
रात्री अपरात्री घोटून
कॉफीच केली नाही
.
कांदे भजी खाता खाता
गप्पा रचल्या नाही
तुझ्या भावविभोर शब्दात
कविता सजल्या नाही
.
तार स्वरात वा~यावरती
सूर फेकले नाही
काहितरी करायला पाहिजे
असे ऐकले नाही
.
भटाबिटांच्या कवितांची पण
छेड काढली नाही
सगळे मिळून अरे वेड्या
पत्र वाचली नाही
.
किती तरी दिवसात लेका
तुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही
.
.
तुषार जोशी, नागपूर
किती तरी दिवसात लेका
उत्तर द्याहटवातुला भेटलो नाही
शहाण्यासारखा वागत गेलो
वेडाच झालो नाही
खरंच कधी तरी असं वेडं व्हावं प्रत्येकानं.