.
.
दारे झाली किती बंद
नाही मानली मी हार
आयुष्यात घेणे नाही
कधी माघार माघार
.
माझ्या वर चालू आले
रूढी कांडांचे वादळ
माझ्या नावेच्या पाठीशी
माझ्या तत्वांचेच बळ
माझ्या हुकुमात माझे
सारे विकार विकार
.
केला सातत्याचा बाण
घेत यशाचाच नेम
एकवटून डोळ्यात
आले माझे रोम रोम
यश चळ चळ कापे
असा प्रहार प्रहार
.
मिळाल्याचा ना हिशोब
हिशोब ना दिल्याचाही
जे मिळाले घेत गेलो
देत गेलो सर्व काही
मला आवडते मन
माझे उदार उदार
.
होवो सतत प्रवास
नित्य नवी लागो गावे
माझ्या उत्कट मनाला
मिळो कवितांचे थवे
माझ्यामुळे आनंदाचा
होवो प्रचार प्रचार
.
.
तुषार जोशी, नागपूर
.
छान. मस्त.
उत्तर द्याहटवाkhoopach sundar kavita, aprateem shabdasanyojan .... pratyek kadyachya shevti dumdaar prahaar !
उत्तर द्याहटवामाझ्या हुकुमात माझे
सारे विकार विकार
.
यश चळ चळ कापे
असा प्रहार प्रहार - best of all !
.
होवो सतत प्रवास
नित्य नवी लागो गावे
माझ्या उत्कट मनाला
मिळो कवितांचे थवे
माझ्यामुळे आनंदाचा
होवो प्रचार प्रचार
... ishha! kiti goad shevat!! :-)
फारच सुरेख. केव्हढा आत्मविश्वास, दर्शवते ही अन् देते ही.
उत्तर द्याहटवाWaaa....
उत्तर द्याहटवा