.
.
मी जिद्दीने प्रयत्न करतोच
अगदी झोकून देतो स्वतःला
पण अनेक प्रयत्न करूनही
जेव्हा सगळं चुकत जातं
अाणि पळून जावंस वाटतं
तेव्हा़़़
हवी तुझी साथ मला
डोळ्यांनी धीर देणारी
"टिकून रहा लढ लढ"
असं सांगणारी ़
.
यशाचीही नशा चढते
सर्व सुखे येतात दिमतीला
अाणि सुख दुखावं तसं
मन कधी कधी भरकटतं
अती करायाला बघतं
तेव्हा़़़
हवी तुझी साथ मला
डोळ्यांनी दटावणारी
"कर्तव्य विसरू नकोस"
असं सांगणारी ़
.
.
तुषार जोशी, नागपूर
(०६ जून २००९)
.
.
Good thought but what if I read it like a prose, without giving the line breaks that are there? Pardon me, but I believe a Poem should be not appear as deliberately put into Poetic mode.
उत्तर द्याहटवाGod bless
RC
मी जिद्दीने प्रयत्न करतोच, अगदी झोकून देतो स्वतःला पण अनेक प्रयत्न करूनही जेव्हा सगळं चुकत जातं आणि पळून जावंस वाटतं तेव्हा़... हवी तुझी साथ मला डोळ्यांनी धीर देणारी "टिकून रहा लढ लढ" असं सांगणारी. यशाचीही नशा चढते सर्व सुखे येतात दिमतीला आणि सुख दुखावं तसं मन कधी कधी भरकटतं अती करायाला बघतं तेव्हा़... हवी तुझी साथ मला डोळ्यांनी दटावणारी "कर्तव्य विसरू नकोस" असं सांगणारी
उत्तर द्याहटवाअसे समजा हा एक विचार आहे. मला या विचारात पण काव्यात्मक अंश आढळतो.