शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

गाभारा

अचानक एखादा
रोमहर्षक विचार यावा
तशी तू शिरलीस मनात
मी समजायचा
प्रयत्न करतोय तेवढ्यात
भिनलीस, रोमारोमात

हे आपल्याला
काहीतरी झालंय
झालय काहीतरी सुंदर
सतत जाणवत असतं
मन उचंबळत असतं
झालय पुरतं कलंदर

मुक्त पक्षिणी प्रमाणे
तुझं आसपास असणं
आणि विचारात स्मरणात
माझ्या आत आत असणं
हे झपाटलेलं जगणं
नाही ठाऊक
जाईल कुठे घेऊन
इतकंच कळतय की
मनाचा गाभारा झालाय
तुझ्या विचाराला जागा देऊन

~ तुष्की
नागपूर, १६ फेब्रुवारी २०१३, ००:३०

३ टिप्पण्या:

  1. अतिशय उत्तम रचना. छान लय.मला असेच आवडेल लिहायला .आवडते लिहायला.
    मला खूप आवडली.मनाच्या गाभारा कोरून गेली .
    मी नव्हतो ,नसतो कधी कधी काही दिवस
    कधी कधी खूप दिवस
    म्हणजे आठवडाभर .म्हणून वाचायला नाही मिळत.

    मुक्त पक्षिणी प्रमाणे
    तुझं आसपास असणं
    आणि विचारात स्मरणात
    माझ्या आत आत असणं
    हे झपाटलेलं जगणं
    नाही ठाऊक
    जाईल कुठे घेऊन
    इतकंच कळतय की
    मनाचा गाभारा झालाय
    तुझ्या विचाराला जागा देऊन

    बस मन भरून ,भारून गेली रचना

    उत्तर द्याहटवा
  2. आपले आवडले..!! यासाठी माझ्याकडून सुपर लाईक..!!

    InfoBulb : Knowledge Is Supreme

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: