.
मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण
एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण
मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण
तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००
.
Jabrya :)
उत्तर द्याहटवाAkda vachun gela mhanu nakos
vachat rahnar aahe samaj ;)
छान...
उत्तर द्याहटवाछान कविता आहे...खरच प्रेरणादायी
उत्तर द्याहटवाविक्रम, नागेश, सागर, अभिप्राय व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवापुन्हा जग जिंकण्यासाठी
उत्तर द्याहटवायेतील कितीतरी क्षण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण
Kharokhar Sundar aahe.......
तुषारजी, कविता आवडली.
उत्तर द्याहटवाविवेकजी, सरदेसाईजी, धन्यवाद
उत्तर द्याहटवातुषार खूपच आवडली कविता । केव्हढा आशावाद झळकतोय शब्दा शब्दातून ।
उत्तर द्याहटवाधन्यवाद आशाताई.
उत्तर द्याहटवासुरेख कविता! सुंदर आशावाद. कविता आवडली. जीवनमूल्यही आवडले.
उत्तर द्याहटवाhttp://nvgole.blogspot.com/2010/08/blog-post_31.html
कविता खूप आवडली. येवढा प्रखर आशावाद हल्लीच्या लेखनात सहसा दिसत नाही.
उत्तर द्याहटवाधन्यवाद नरेंद्र जी आणि विशाखा जी
उत्तर द्याहटवा