मंगळवार, १३ एप्रिल, २०१०

बायको म्हणजे

.


बायको म्हणजे
एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते
पावलोपावली
घराला घरपण देणारी

बायको म्हणजे
निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे
नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची

बायको म्हणजे
ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे
सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे

बायको म्हणजे
गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे
प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी

बायको म्हणजे
प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे
अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी

बायको म्हणजे
सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे
नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा

बायको म्हणजे
संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे
समर्थता
माणसाला यश पचवण्याची

तुषार जोशी, नागपूर
१३ एप्रिल २०१० 
 
.

७ टिप्पण्या:

  1. खूप छान कविता आहे. पहिल्यांदाच बायको या नात्यावर इतकी सन्मानाची कविता लिहिणारं कुणीतरी भेटलं.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद कांचन. अनेक लोकांनी लिहिलेय बायकोवर, मराठी कविता नावाच्या ऑरकूट समूहावर एक अखंड धागा आहे अश्या कवितांचा.

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त कविता
    अजुन मला अनुभव नाही...
    लग्न झाले कि मी पण माझ्या बायको वर लिहिण एक कविता :D

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच छान, पहिल्यांदाच वाचली अशी सुंदर कविता

    उत्तर द्याहटवा
  5. बायको म्हणजे.......इतके सुंदर विचार वाचून खूप बरं वाटलं । नाही तर बायको म्हणजे चे विचार भांडणारी, तणतणणारी, रागावणारी आणखी ही खूप -विशेषणं लावलेले असतात . अभिनन्दन ।

    उत्तर द्याहटवा
  6. धन्यवाद सोनाली। प्रशांत, नागेशजी आणि आशाताई

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: