.
.
तू बोलतेस ना
तेव्हा मन बोलतेस
गोड गोड उत्कटतेचे
क्षण बोलतेस
.
मी ऐकतो
मोहरतो
भान विसरतो
तुला ऐकणे माझ्यासाठी
सोहळा ठरतो
.
तू बोलतेस ना
तेव्हा तेव्हा वेळ थांबते
सगळे आयुष्य काही वेळ
विसरायला होते
.
मी ऐकतो
बहरतो
नवा होतो
त्या क्षणांचे
आनंदकण
वेचून घेतो
.
तू बोलतेस ना
पोचतेस तेव्हा शब्दाशब्दातून
आर्त संगीत ऐकू येते
खोल हृदयातून
.
मी ऐकतो
मी जपतो
जतन करतो
तुला ऐकणे माझ्यासाठी
सोहळा ठरतो
.
.
तुषार जोशी, नागपूर
(०७ मार्च २००९/टेरीटाऊन)
.
http://marathiblogs.net/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट अवश्य वाचा.
उत्तर द्याहटवाआपला सहभाग प्रार्थनीय आहे.
Beautiful !
उत्तर द्याहटवाPlease remove word verification
उत्तर द्याहटवाva sundarach ahe kavita !
उत्तर द्याहटवा