नागपूरचा कवी तुष्की नागपुरी याच्या कविता या ब्लाग वर वाचा
गुरुवार, ५ मार्च, २००९
साक्षात्कार
. . गुदमरून जाईन इतकी घट्ट मिठी मला हवी खूप दिवस पुरेल अशी तुझी दिठी मला हवी . आवेगात लिहिलेली भावनांची वही मला हवी माझ्या तळहातावर तुझी एक सही मला हवी . ए नको ना रे लटका नकार मला हवा ओठांवर ओठांचा गोड साक्षात्कार मला हवा . . तुषार जोशी, नागपूर
आवेगात लिहिलेली
उत्तर द्याहटवाभावनांची वही
मला हवी
माझ्या तळहातावर
तुझी एक सही
मला हवी
sundar!
kup chan aahe .....
उत्तर द्याहटवा