.
.
तुला पहिल्यांदा पाहिले ना
तेव्हाच कळले तू म्हणजे
जादूगार,खळखळणारे हसू पसरवणारी
.
तुला भेटत गेलो नंतर
तेव्हा कळले तू ज्योत आहेस
उदासिनतेच्या अंधाराचा नाश करणारी
.
तुला समजत गेलो आणि
तेव्हा कळले तू नुसते असणे
म्हणजेच प्रसन्नता आयुष्य खुलवणारी
.
तुषार जोशी, नागपूर
.
ही कविता कितीतरी वेळेला वाचली आहे.
उत्तर द्याहटवानेहमी वाटते की इथे एकही टिप्पणी कशी काय नाही ?
पण मग वाटते, की शब्दांपलिकडे घेऊन जाणार्या कवितेवर
टिप्पण्या आहेत. शब्दांपलिकडच्या ..
धन्यवाद शार्दूल, वाचल्यावर आवर्जून अभिप्राय लिहिल्याबद्दल
उत्तर द्याहटवा