.
आठवणींच्या बरणीत
हात घातला मी,
नेहमी प्रमाणे
इससस टोचलीच
एक आठवण
जीव घेतला तिने
कल्पनाच नव्हती
इतकी कडकडून
टोचेल ती
हृदयाला चिरून
अंतहृदयात
पोचेल ती
लगेच बांधली
मग एक पट्टी
शहाणपणाची
लिलया पांघरली
शुभ्र चादर
शांत दिसण्याची
तुषार जोशी, नागपूर
.
वा, इथे पण आठवणच, पण जीवघेणी. माझ्या आठवणी गमती जमतीच्या वाचल्यास बघा.
उत्तर द्याहटवा