.
बाहेर जाताना विचारते कोणती साडी घालू
उत्तर देताच म्हणते घालू का हिरवाच शालू
आधीच ठरले होते तर विचारायचे कशाला?
कोणतीही घाल म्हणायची सोय नाही बिचाऱ्याला
तसे म्हटले तर नको तेव्हा रूसून बसणार बाई
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
ही गाडी चालवणार तेव्हा मी डोळे मिटतो
हिला इतर गाड्यांचा अफाट अंदाज असतो
कुठेही ब्रेक लावते कुठेही शहनाई हार्नची
डेंटींग पेन्टींगनेच होते सांगता महिन्याची
हवे तसे वळणावर कधीच वळत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
आउच्या काऊचे काहीतरी उगाच सांगत बसते
टिव्ही सिरियलच्या प्रसंगांवर हसते रडते
या कानातून त्या कानात केले तर येतो राग
ऐकण्याचे नाटक केले तर तेही पडते महाग
यांना दया म्हणूनही जरा शांत राहता येत नाही
या बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
तुषार जोशी, नागपूर
खरच तुषार या बायकांना................ बाप रे पुढे बोलू नये, बायकांनी ऐकल तर काही खर नाही. छान लिहिला आहेस कविता.
उत्तर द्याहटवाकविता सुंदर आहे.तुमचा ब्लॉग न्याहाळला.खुपच सुंदर आहे.जरा फुरसदीने वाचायची इच्छा आहे.
उत्तर द्याहटवागंगाधर मुटे
ahahahaa..
उत्तर द्याहटवाmast aahe kavita..
changla blog suddha aahe :D
तुम्हाला ती विचारिते साडी कोणती घालू कारण ती बघते तुम्हाला किती कळत ते...............
उत्तर द्याहटवाकाही नसत कळल बायकांना
तर तुमची काही सोय नवती
SAVE CHILD BABY महणून
दुनिया ओरडत नसती...............
आणि आई च्या हि प्रेमाला दुनिया कधी पारखी नसती
khupach mast! saglyancha anubhav arkhach. chan zali kavita.
उत्तर द्याहटवास्वाती जी,
उत्तर द्याहटवातुमच्या प्रतिक्रियेवरून समजते आहे की तुम्ही ही कविता फार मनाला लावून घेतलेली आहे. ही कविता वाचताना त्यातला विनोद कळायला हवा, म्हणजे राग येणार नाही. तुम्ही याच ब्लाग वरची 'बायको म्हणजे' ही कविता पण वाचावी अशी विनंती आहे.