गुरुवार, ८ जानेवारी, २००९

टचं-टचं बोललीस

.
.
टचं-टचं बोललीस
किती टोचलीस मला
काटेरी झालीयेस ग
कसं सहन होतं तुला
.
मला त्रास होतो ना
तुझ्या बोलण्याचा
किती त्रास होत असेल
आतून तुलाही त्याचा
.
स्वतःची अन तुझी
काळजी घेईन आता
विश्वासाने गळून पडेल
एकूण एक काटा
.
टचं टचं बोललीस पण
तूच कौतुक करशील
गुणाची माझी पोर गं
लाडाने तूच म्हणशील
.
तुषार जोशी, नागपूर
.

२ टिप्पण्या:

  1. खरच आईला असाच त्रास दिला होता :-(
    पण मनात जाणीव आहे याच्यापुढे त्रास न होऊ द्यायची

    उत्तर द्याहटवा
  2. संदीप कविता पोचली हे वाचून आनंद झाला.
    अभिप्रायासाठी धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: