.
.
टचं-टचं बोललीस
किती टोचलीस मला
काटेरी झालीयेस ग
कसं सहन होतं तुला
.
मला त्रास होतो ना
तुझ्या बोलण्याचा
किती त्रास होत असेल
आतून तुलाही त्याचा
.
स्वतःची अन तुझी
काळजी घेईन आता
विश्वासाने गळून पडेल
एकूण एक काटा
.
टचं टचं बोललीस पण
तूच कौतुक करशील
गुणाची माझी पोर गं
लाडाने तूच म्हणशील
.
तुषार जोशी, नागपूर
.
खरच आईला असाच त्रास दिला होता :-(
उत्तर द्याहटवापण मनात जाणीव आहे याच्यापुढे त्रास न होऊ द्यायची
संदीप कविता पोचली हे वाचून आनंद झाला.
उत्तर द्याहटवाअभिप्रायासाठी धन्यवाद!