शुक्रवार, ९ जानेवारी, २००९

तुला पहिल्यांदा पाहिले ना

.
.
तुला पहिल्यांदा पाहिले ना
तेव्हाच कळले तू म्हणजे
जादूगार,खळखळणारे हसू पसरवणारी
.
तुला भेटत गेलो नंतर 
तेव्हा कळले तू ज्योत आहेस
उदासिनतेच्या अंधाराचा नाश करणारी
.
तुला समजत गेलो आणि
तेव्हा कळले तू नुसते असणे
म्हणजेच प्रसन्नता आयुष्य खुलवणारी
.
तुषार जोशी, नागपूर
.

२ टिप्पण्या:

 1. ही कविता कितीतरी वेळेला वाचली आहे.

  नेहमी वाटते की इथे एकही टिप्पणी कशी काय नाही ?
  पण मग वाटते, की शब्दांपलिकडे घेऊन जाणार्‍या कवितेवर
  टिप्पण्या आहेत. शब्दांपलिकडच्या ..

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद शार्दूल, वाचल्यावर आवर्जून अभिप्राय लिहिल्याबद्दल

  उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: