मंगळवार, १७ जुलै, २०१२

दुसरं प्रेम

"माझं तुझ्यावर प्रेम आहे"
म्हणल्यावर लगेच म्हणाला
पण माझं लग्न आहे झालेलं.
"कंप्युटर" नावाच्या सवतीबरोबर
नांदायला तयार असशील
तर माझं हृदय मी कधिचं
आहे तुला दिलेलं.

हो म्हणून हसले
आणि… त्याचं
(दुसरं तं) दुसरं प्रेम
होऊन त्याची होऊन बसले.

तिच्याजवळ असला
की माझ्याकडे तो पाहतही नाही
तासंतास तिच्याशी
गप्पा मारण्यात सगळा वेळ जाई
माझ्याकुशीतून निघताच
सकाळी तिच्याकडे घेतो धाव
तरीही मला ही सवत
चालून जाते राव

ती फक्त वेळ मागते
हृदय मागत नाही
दुसरं प्रेम तर दुसरं पण
हृदयाने तर तो माझाच राही

तुषार जोशी, नागपूर
+९१ ९८२२२ २०३६५
१६ जुलै २०१२, २३:००

२ टिप्पण्या:

  1. खूप छान पॉईंट ! आता तिकडे पटवायला हवाय !

    उत्तर द्याहटवा
  2. " तुषार जोशी, नागपूर च्या कविता या ब्लाग वर वाचा " हे आहे तुमच्या ब्लॉगचे हेडींग...


    ... म्हणजे नागपूर व्यतिरिक्त च्या कविता मग कुठे वाचायच्या ?

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: