शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

खूप दुखतय रे!

.

बाबा...
बोट दुखतय रे
बाबा
खूप दुखतय रे
.
काय झालं बेटा
बोट भाजल का?
तुला सांगितलंच होत ना
कढईला हात लावू नकोस म्हणून.
.
बाबा
खूप दुखतय रे
हो ग बेटा
मी फुंकर घालून देतो
.
पण ते थोडं दुखणारच बरं
मी पाठीशी आहे
पण तुझं दुःख तुलाच
जगायचय बरं


बाबा...
हृदय दुखतय रे
बाबा
खूप दुखतय रे
.
काय झालं बेटा
तो सोडून गेला?
तुला सांगितलंच होतं ना
तो प्रामाणिक वाटत नाही म्हणून
.
बाबा
खूप दुखतय रे
हो ग बेटा
खांद्यावर डोक टेक रडून घे
.
पण ते थोडं दुखणारच बरं
मी पाठीशी आहे
पण दुःख सहन करायला
शिकायचंय बरं

तुषार जोशी, नागपूर

.

३ टिप्पण्या:

  1. इतकी बाप लेकी च्या जिवा भावा ची कविता खूप म्हणजे खूपच आवडली ।

    उत्तर द्याहटवा
  2. awesome creation...khup khup chhan...babanchi aathavan aali ekdum...dole bharu aale..

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद आशाताई, धन्यवाद रिधिमा, तुम्हाला कविता आवडली आणि संदर्भ जोडता आले याचा मला आनंद आहे. तुम्ही वेळ काढून तुमची आवड लिहून कळवली म्हणून तुमचे पुनश्च धन्यवाद.

    तुषार

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: