सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१२

पुन्हा

पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं
तुझ्या सुखाचं कारण ठरावंसं वाटतं

मुलींच्या शाळा अभ्यास
यात मन लावून राबतेस
अजून पुढे शीकण्यासाठी
अभ्यास करत  रात्री जागतेस
तेव्हा तुझं कौतुक वाटून
मनभरून बघावंसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

मिळेल तेवढाच माझा वेळ
समाधानाने समजून घेतेस
जगणे सफल होण्यासाठी
सोबतीचे बळ देतेस
कितीही केलं तरी तुझ्यासाठी
अजून काही करावसं वाटतं
पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

~ तुष्की
०८ आक्टोबर २०१२, १०:००
वर्नान हिल्स, शिकागो

७ टिप्पण्या:

  1. आवडली कविता .एका वयानंतर ही जाणीव होते .आणि पत्नीच्या कष्टाची ,त्यागाची जाणीव होते .आणि तिचे रूप हे अनोखेच वाटु लागते .हे खरे आहे.
    कविता आवडली.
    तुषारजी. कदाचित मलाही असेच लिहायला आवडेल.आवडते .


    मुलींच्या शाळा अभ्यास
    यात मन लावून राबतेस
    अजून पुढे शीकण्यासाठी
    अभ्यास करत रात्री जागतेस
    तेव्हा तुझं कौतुक वाटून
    मनभरून बघावंसं वाटतं
    पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंसं वाटतं

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुषार जोशी ची "पुन्हा" कविता वाचली आणि आणि आस लिहावं वाटल

      खरेच पुन्हा प्रेमात पडशील ना ?
      प्रत्येक प्रसंगी माझ्याशिवाय आडशील ना?
      पुढच्या जन्मी सुधा देवा कडे मला मागशील न ?

      चिमणा चिमणी चे आपले घरटे जमवताना
      दमायला होत कधी कधी तुझ्या बरोबर चालताना
      मीच दिसेल ना रे तुला मागे वळून पाहताना ?

      कधी एखादे वेळी नाही देवू शकले स्वप्नातली पहाट
      तुझ माझ्या बरोबर आसण दिमाखात मिरवतेय माझ ललाट
      तुझ्याच कर्तुत्वाने होतोय माझ्या जीवनी थाटमाट …।

      तुला माझ्या साठी काही करावस वाटल
      आणि माझ्या तन मना वरून मोरपीस फिरलं
      इतक नह्वत रे मी देवा कडे काही मागितलं ….

      किती करतोस माझ्या साठी
      जाण आहे मला त्याची
      एका क्षणाची थोडीच आहे आपली भेट
      आपल्या तर आहेत साता जन्माच्या गाठी

      सौ. धनश्री देव. ६/१२

      हटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: