सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

एक कविता करता येईल

.

तुझ्या सुरेख दिसण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या मोहक हसण्यावर
एक कविता करता येईल

खळी भरल्या गालावर
एक कविता करता येईल
तुझ्या श्वासांच्या तालावर
एक कविता करता येईल

सावळ्या तुझ्या रंगावर
एक कविता करता येईल
तुझ्या सहज ढंगावर
एक कविता करता येईल

तुझ्या ओठातल्या गाण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या डोळ्यातल्या पाण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या रोखून बघण्यावर
एक कविता करता येईल
क्षणात ठोका चुकण्यावर
एक कविता करता येईल

तुला सगळे कळण्यावर
एक कविता करता येईल
तुझ्या बेमालूम लपवण्यावर
एक कविता करता येईल

तुझ्या उगाच वगळण्यावर
एक कविता करता येईल
वळून मला छळण्यावर
एक कविता करता येईल

तू असताना असण्यावर
एक कविता करता येईल
तू नसताना नसण्यावर
एक कविता करता येईल

तुषार जोशी, नागपूर
२० सप्टेंबर २०१०, २१:००

४ टिप्पण्या:

 1. तुमच्या ह्या सुंदर कवितेवर
  एक कविता करता येईल....

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद देवेंद्र, तुमच्या अभिप्रासासाठी आणि प्रसंगावधानासाठी

  (विनम्र)
  तुषार

  उत्तर द्याहटवा
 3. वा वा कवितांची माळ घालायचा विचार दिसतोय प्रेयसीला . सुंदर कविता.

  उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: