मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

मनाची कविता

.

मी हरलो म्हणू नकोस
यावेळी हरलोय म्हण
पुन्हा जग जिंकण्यासाठी
येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस
सध्या एकटा आहे म्हण
आयुष्य संपले नाही अजून
भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस
जरा दम घेतोय म्हण
पुन्हा झेप घेण्यासाठी
पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर
१७ आगस्ट २०१०, ०९:००

.

१२ टिप्पण्या:

  1. छान कविता आहे...खरच प्रेरणादायी

    उत्तर द्याहटवा
  2. विक्रम, नागेश, सागर, अभिप्राय व प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. पुन्हा जग जिंकण्यासाठी
    येतील कितीतरी क्षण
    पुन्हा झेप घेण्यासाठी
    पेटून उठेल एकेक कण
    Kharokhar Sundar aahe.......

    उत्तर द्याहटवा
  4. तुषार खूपच आवडली कविता । केव्हढा आशावाद झळकतोय शब्दा शब्दातून ।

    उत्तर द्याहटवा
  5. सुरेख कविता! सुंदर आशावाद. कविता आवडली. जीवनमूल्यही आवडले.

    http://nvgole.blogspot.com/2010/08/blog-post_31.html

    उत्तर द्याहटवा
  6. कविता खूप आवडली. येवढा प्रखर आशावाद हल्लीच्या लेखनात सहसा दिसत नाही.

    उत्तर द्याहटवा
  7. धन्यवाद नरेंद्र जी आणि विशाखा जी

    उत्तर द्याहटवा

ही कविता वाचून तुम्हाला कसे वाटले? पटली का? काही जुने अनुभव ताजे झाले का? आवडली का? तुम्हाला पण काही लिहावेसे वाटले का? इथे तुमचा अभिप्राय लिहून जा: